भरणे कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी खा.शरद पवार भरणेवाडीत ; व्यक्त केली दु:ख...*

​*भरणे कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी खा.शरद पवार भरणेवाडीत ; व्यक्त केली दु:ख...* 



इंदापूर:महाराष्ट्र राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मातोश्री गिरीजाबाई उर्फ जीजी विठोबा भरणे यांचे  शुक्रवारी दि.१ जुलै रोजी वृध्दापकाळाने दु:खद निधन झाले.त्यानंतर सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.आज   राष्ट्रवादी काँग्रेसचे  अध्यक्ष  खासदार  शरद पवार यांनी भरणेवाडी येथे दाखल होत भरणे  कुटुंबाचे सांत्वन केले.गिरीजाबाई उर्फ विठोबा भरणे यांच्या निधनाबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले आहे.


माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांसह भरणे कुटंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असताना देशाचे नेते शरद पवार यांनी भरणेवाडी निवासस्थानी भेट देऊन संपूर्ण भरणे कुटुंबाचे सांत्वन केले.यावेळी रामचंद्र भरणे, आबासाहेब भरणे,मधुकर भरणे आणि दत्तात्रय भरणे ही चारही भावंडं व भरणे परिवार उपस्थित होता.

भरणे कुटुंब हे  शेतकरी  असल्याचे  सांगितले. 

गिरीजाबाई विठोबा भरणे यांवर मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर अकलूज येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.मात्र शुक्रवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.शुक्रवारी दुपारी २ वाजता भरणेवाडी येथे त्यांच्या अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी मोठा  जनसागर लोटला होता.

यावेळी  फलटणचे आमदार दिपक चव्हाण उपस्थित होते ..

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*