​शं. पा. चॅरिटेबल ट्रस्ट संचालित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर यांच्या वतीने वारकऱ्यासाठी मोफत वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिर, चरणसेवा, चहा व अल्पोपहार आयोजन.

​शं. पा. चॅरिटेबल ट्रस्ट संचालित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर यांच्या वतीने वारकऱ्यासाठी मोफत वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिर, चरणसेवा, चहा व अल्पोपहार आयोजन.


इंदापूर: श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा इंदापूर शहरांमध्ये लाखोच्या संख्येने वारकऱ्यांसह दाखल झाला. या वारकऱ्यांचा सेवाभावी वृत्तीने आपल्या हातून सेवा घडावी या निमित्ताने दि. २जुलै २०२२ रोजी शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचालित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर यांच्या वतीने वारकऱ्यासाठी मोफत वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे. तसेच चरणसेवा, चहा व अल्पोपहार यांचे आयोजन करण्यात आले .संत जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळा इंदापूर मध्ये दाखल झाला आहे.या उपक्रमाला सुरुवात दुपारी २.वाजता झाली आहे.

या उपक्रमास संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव डॉ देसाई सर, खजिनदार  श्री तुषार रंजणकर, विश्वस्त श्री अरविंद गारटकर सर, केंद्राच्या डॉक्टर मनोजकुमार शिंदे, डॉक्टर शिंदे मॅडम, केंद्राचे प्रमुख श्री महादेव चव्हाण सर, श्री भारत बोराटे सर, लक्ष्मी वैभव चे संपादक श्री धनंजय कळमकर, सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई आतार, इंदापूर अर्बन बँकेचे संचालक  अविनाश कोथमीरे, इंदापूर अर्बन बँकेचे संचालक दादासाहेब पिसे, सामाजिक कार्यकर्ते सागर गानबोटे, पत्रकार मांढरे , जावेद हबीब चे श्री अमोल राऊत सर , नेहा शितोळे मॅडम, यांच्या मार्गदर्शनाखाली वारकऱ्यांच्या सेवेत दाखल होऊन,  चॅरिटेबल ट्रस्ट चा सर्व स्टॅप, विद्यार्थी,यांचे सहकार्य लाभले .

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*