​इंदापुरात संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे गोल रिंगण लाखो वैष्णव्यांच्या उपस्थित नेत्रदिपक

​इंदापुरात संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे गोल रिंगण लाखो वैष्णव्यांच्या उपस्थित नेत्रदिपक

प्रशासनाचा चोख बंदोबस्त; रिंगण पाहण्यासाठी लाखो वैष्णवांचा लोटला जनसागर


फोटो - इंदापूर मध्ये श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या गोल रिंगणामध्ये लोटलेला लाखो वैष्णव भक्तांचा जनसागर.


इंदापूर ,ता.२जुलै इंदापूर तालुक्यातील निमगांव केतकी येथील पाहुणचार घेऊन श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा विठ्ठल नामाच्या गजरात (दि.२) जुलै रोजी इंदापूर शहरात दुपारी १२ वाजायच्या सुमारास आगमन झाले. रयत शिक्षण संस्थेच्या कस्तुराबाई हायस्कूलच्या मैदानामध्ये लाखो वारकऱ्यासह, नागरिकाचा जनसागर लोटला होता. इंदापूर शहरात कोरोना कालखंडानंतर दोन वर्षांनी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं आगमन होत होते आणि हा दिमागदार सोहळा पाहण्यासाठी ,आपल्या नेत्रामध्ये साठवण्यासाठी अबाल वृद्ध, महिला, नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. एक प्रकारचा जनसागर लोटला होता. जो तो ज्ञानबा तुकाराम माऊली चा नामघोष करत होता. इंदापूर शहरात जागोजागी अनेक दिंड्यांना चहा, नाश्ता, दूध,फराळ भोजनाची अनेक सामाजिक ,राजकीय, संघटना, ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली होती.सदरचा रिंगण सोहळा संपन्न झाल्यानंतर श्री नारायणदास रामदास हायस्कूल या ठिकाणी श्री संत तुकाराम महाराज पालखी मुक्काम दोन दिवस असणार आहे. लाखो भक्तांना तिथे दर्शन घेण्यासाठी व्यवस्थाकेली आहे.


रयत शिक्षण संस्थेच्या कस्तुराबाई हायस्कूलच्या मैदानामध्ये श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे व मानाच्या दिंड्या,अश्वाचे सर्वांचे स्वागत करण्यासाठी व मैदानात पालखी व्यवस्था ठेवण्यासाठी इंदापूर नगरपालिकेच्या वतीने देखणे नियोजन  केलं होते. या सर्व दिंड्यांचे आणि पालखी सोहळ्यांचे स्वागत करण्यासाठी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर,इंदापूरच्या नगराध्यक्षा अंकिता शहा, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष नगरसेवक भरतशेठ शहा, मुकुंदशेठ शहा त्याचप्रमाणे पाटील कुटुंबाच्या परिवारातून माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील, मुलगी अंकिता पाटील-ठाकरे, मुलगा राजवर्धन पाटील ,बापूराव जामदार हे उपस्थित होते. तसेच, माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, , ज्ञानेश्वर चौगुले, माऊली वाघमोडे, विशाल बोंद्रे, मेजर महादेव सोमवंशी,पांडुरंग शिंदे,अँड. राहुल मखरे, शिवाजीराव मखरे, सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई आतार, विविध सामाजिक, राजकीय संघटनेचे पदाधिकारी ,आदी  मान्यवर उपस्थित होते.


*प्रशासनचा चोख  बंदोबस्त व विविध वारकऱ्यांसाठी सुविधा*


इंदापूरचे कर्तव्यदक्ष तहसीलदार श्रीकांत पाटील व प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी इंदापूर शहरांमध्ये श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आगमनासाठी, रिंगण सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त आपल्या अधिकारी पथकाच्या द्वारे ठेवला होता. वारकऱ्यांची कुठलीही गैरसोय होऊ नये याची दखल घेतली होती. अतिशय नियोजनबद्ध या रिंगण सोहळ्याची व्यवस्था तहसीलदार श्रीकांत पाटील व त्यांच्या पथकाने केली होती. प्रत्येक ठिकाणी स्वतः तहसीलदार श्रीकांत पाटील हे बारकाईने  लक्ष देऊन होते आणि प्रत्येक पथकातील अधिकाऱ्याला शिस्तबद्ध सूचना दिल्या होत्या. त्यामुळे या रिंगण सोहळ्यात अतिशय नियोजनबद्ध सर्व येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना कुठलीही गैरसोय जाणवली नाही. स्वतः तहसीलदार श्रीकांत पाटील, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे त्यांचे पथक भक्तीमय झालेले  दिसून येत होते. अनेक वारकऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध केल्या होत्या. ठिकठिकाणी इंदापूर तहसीलचे कर्मचारी दिलेले कामे शिस्तबद्ध बजावत होते.


*इंदापूर पोलीस अधिकाऱ्यांचा तगडा बंदोबस्त*


इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टि. वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस स्टेशनच्या सर्वच अधिकाऱ्यांनी त्यामध्ये सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे, प्रकाश पवार, नागनाथ पाटील, महेश माने, दाजी देठे व त्यांच्या सर्वच पोलीस कर्मचाऱ्यांनी जागजोगी पोलीस पथके नेमून वारकऱ्यांना कुठली गैरसोय होऊ नये याची काळजी घेतली होती. साध्या पोशाखात शेकडो पुरुष पोलीस आणि महिला पोलीस अधिकारी पालखी बंदोबस्तासाठी आपली कामगिरी अचूक बजावीत होते. या पालखी सोहळ्यासाठी बारामती अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते पोलीस अधीक्षक वरिष्ठ पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस स्टेशनचे टि.वाय.मुजावर यांनी अतिशय तगडा बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे इंदापूर लाखो आलेल्या वारकरीसह भक्तांची कुठलीही गैरसोई झालेली नाही. पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा फुगडी खेळणे, वारकऱ्यासोबत टाळ वाजवणे हा मोह आवरता आला नाही. पोलीस अधिकारी सुद्धा विठ्ठल नामाचा ज्ञानबा तुकारामचा जयघोष करीत पालखी सोहळ्याचा आनंद घेतला.


-------------

 




 

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*