बांडेवाडी शाळेत पालखी सोहळा उत्साहात संपन्न.
बांडेवाडी शाळेत पालखी सोहळा उत्साहात संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी:दि २ बांडेवाडी येथील शाळेत सर्वत्र सुरू असलेल्या पालखी सोहळ्याचा अनुभव घेता यावा यासाठी बांडेवाडी येथील शाळेत बालचमुच्या पायी दिंडी सोहळ्या्चे आयोजन करण्यात आले होते.
विठ्ठल रखुमाई , पताका , टाळ , तुळस , रंगीबेरंगी साड्या घातलेल्या मुली , कुर्ता पायजमा टोपी घातलेली मुले लक्ष वेधून घेत होती. जागोजागी विठ्ठल रखुमाई वेषातील मुलांचे औक्षण करण्यात आले. शाळा समिती अध्यक्ष दिपक बांडे , रणजीत काळे , संदिपान बांडे , अर्चना बांडे यांनी मुलांना फरसाण , बिस्किट , शिरा , मसालेभात जेवण दिले.
*पालखी सोहळ्याचे नियोजन मुख्याध्यापक संतोष हेगडे , अंगणवाडी सेविका सुनंदा पोंदकुले यांनी केले. पालक आण्णा बांडे , आप्पा पवार , सतिश बांडे , महिला पालक , जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.*
Comments
Post a Comment