माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंना मातृशोक* *भिमाई आश्रमशाळेत कै. गिरीजाबाई विठोबा भरणेंना (जिजी) वाहिली आदरांजली*.
*माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंना मातृशोक*
*भिमाई आश्रमशाळेत कै. गिरीजाबाई विठोबा भरणेंना (जिजी) वाहिली आदरांजली*.
*इंदापूर* ( *दि १*) :- येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात सर्व विभागाच्या विद्यार्थी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्तब्ध उभे राहून कै. गिरीजाबाई विठोबा भरणेंना ( जिजी) शुक्रवारी (दि.१) सकाळी १०:३० वा. आदरांजली वाहिली.
राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री व मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे विशेष निमंत्रित सदस्य श्री. दत्तात्रेय भरणे (मामा) यांच्या मातोश्री गिरीजाबाई उर्फ जिजी विठोबा भरणे यांचं नुकतंच शुक्रवार दि.१ जुलै रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
मागील काही दिवसापासून त्यांच्यावर अकलूज येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. कै. गिरीजाबाई विठोबा भरणे ह्या जिजी म्हणून सर्वदूर परिचित होत्या. त्यांचा अत्यंत मनमिळावू,शांत व प्रेमळ असा स्वभाव होता. त्यामुळे जिजींचा घरात आदरयुक्त दबदबा होता.
यावेळी संस्थेचे सचिव ॲड. समीर मखरे आदरांजली वाहताना म्हणाले की,महाराष्ट्राच्या हितासाठी अहोरात्र झटणारे माजी राज्यमंत्री दत्तात्रय (मामा) भरणेंना मातृशोक. ही घटना अतिशय दुःखद आहे.आम्ही सर्वजण त्यांच्या दुःखात सहभागी आहोत. मामांना व त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्यासाठी भगवंत ताकद देवो हीच प्रार्थना !
दिवंगत जिजींना भावपूर्ण श्रद्धांजली.
Comments
Post a Comment