​इंदापूर शहर शिवसेनेने पाच हजार वारकऱ्यांना पुरविले गोळ्या औषधे बाबा चौकात शिवसेना क्षेत्र प्रमुख सचिन चौगुले यांचा विधायक उपक्रम

​इंदापूर शहर शिवसेनेने पाच हजार वारकऱ्यांना पुरविले गोळ्या औषधे बाबा चौकात शिवसेना क्षेत्र प्रमुख सचिन चौगुले यांचा विधायक उपक्रम 


 इंदापूर : इंदापूर शहरात तब्बल दोन वर्षांनंतर जगतगुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आगमन  २ जुलै रोजी झाले असून, पालखीचा दोन दिवस मुक्काम शहरात आहे. पालखी इंदापूर शहरात येताच इंदापूर शहर शिवसेनेचे क्षेत्र प्रमुख सचिन चौगुले व शहर समन्वयक संजय खंडागळे यांच्या मित्र परिवाराच्या वतीने पाच हजार वारकऱ्यांना मोफत गोळ्या औषधांचे वाटप करण्यात आले आहे. 


पालखी सोहळ्यात देहू वरून पायी चालत येणाऱ्या वारकरी भक्तांना शिवसेनेच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व मोफत गोळ्या औषधे बाबा चौक येथे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जेष्ठ मार्गदर्शक विशाल बोन्द्रे, पोलीस निरीक्षक तयुब मुजवर, तालुकाप्रमुख नितीन शिंदे, शहर प्रमुख मेजर महादेव सोमवंशी, उप शहर प्रमुख अशोक देवकर, बालाजी पाटील ,सुदर्शन साखरे उप तालुका प्रमुख, विजय साखरे

 सर्व शिवसैनिक पदाधिकारी  कार्यकर्ते उपस्थित होते

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय काळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख सुरज काळे, सचिन चौगुले, ज्ञानेश्वर चौगुले, अविनाश चौगुले व अविनाश खंडागळे निखिल बंगाळे यांच्या हस्ते फित कापून उपक्रमास सुरवात करण्यात आली. 


यावेळी वैद्यकीय अधिकारी विनोद राजपुरे, शिवसेना आरोग्य मदत केंद्राचे भूषण सुर्वे, सागर आवटे व परिचारिका यांनी वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून गोळ्या औषधे यांचे वाटप केले. यावेळी वारकऱ्यांना 

गोळ्या व औषधांमध्ये सर्दी पडसे, खोकला पातळ औषध, अंगदुखी, डोकेदुखी, कणकणी, वात, पित्त, जुलाब, उल्टी, प्रथम उपचार व पेनकिलर मलम मोफत वाटण्यात आले. 


फोटो ओळ : इंदापूर शहरातील बाबा चौक येथे वारकऱ्यांना शिवेसेनेचे क्षेत्र प्रमुख सचिन चौगुले यांच्या हस्ते गोळ्या औषधांचे मोफत वाटप करताना मान्यवर

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*