​नवीन सरकार महाराष्ट्र राज्यासह, सर्वसामान्य जनतेच्या चौफेर विकासासाठी कटिबद्ध : हर्षवर्धन पाटील.

​नवीन सरकार महाराष्ट्र राज्यासह, सर्वसामान्य जनतेच्या चौफेर  विकासासाठी कटिबद्ध : हर्षवर्धन पाटील.


इंदापूर: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले अभिनंदन.

यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले की, राज्यात अनैसर्गिक पद्धतीने सत्तेवर असलेले महाविकास आघाडी सरकार आता राहिलेले नाही. सर्वसामान्य जनतेचा या आघाडी सरकारला चेहरा नसल्याने नियतीने या सरकारला पायउतार होण्यास भाग पाडले. 

         नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमं देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे नवीन सरकार राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी सत्तेवर आले असून त्यामुळे राज्याच्या विकासासाठी व सर्वसामान्य, गरजू, शेतकरी, कष्टकरी, सुशिक्षित बरोजगारांसाठी काम करेल. तसेच माझ्या इंदापूर तालुक्याचा विकास देखील गती मिळेल.  देशाचे पंतप्रधान  नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राला अधिक बळकटी देण्याकरिता मा.एकनाथ शिंदे व  मा.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या राजकीय व प्रशासकीय अनुभवातून ते महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचे कार्य करतील यात कोणतीही शंका नाही. आपल्या महाराष्ट्र राज्यासह इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. पुनश्च एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून अभिनंदन.

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*