आधार सेवा परिवारातर्फे१२० विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप.
आधार सेवा परिवारातर्फे१२० विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप.
इंदापूर:इंदापूर शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ५ मधील १२० विद्यार्थ्यांना आधार सेवा परिवाराच्या वतीने वह्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जैन संघटनेचे इंदापुर शहराध्यक्ष श्री धरमचंद लोढा होते . आधार सेवा परिवाराचे अध्यक्ष श्री अरुण राऊत सर , श्री बाळासाहेब क्षीरसागर, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सायराबी शेख यांच्या हस्ते वह्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षिका व पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी श्री अरुण राऊत, धरमचंद लोढा, नानासाहेब हेगडे , संदीप शहा , डॉ अभिजीत ठोंबरे , डॉ सागर दोशी , डॉ. राकेश कर्डिले , श्री दत्तात्रय यादव , श्री भारत राऊत, सौ.मानसी कुलकर्णी यांनी देणगी दिली. आभार सौ रत्ना काळे मॅडम यांनी मानले.
Comments
Post a Comment