​राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मातोश्री गिरीजाबाई उर्फ जीजी विठोबा भरणे यांचं नुकतचं निधन . आज दुपारी २ वाजता होणार अंत्यविधी

​राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मातोश्री गिरीजाबाई उर्फ जीजी विठोबा भरणे यांचं नुकतचं निधन .


 आज दुपारी २ वाजता होणार अंत्यविधी



इंदापूर:महाराष्ट्र राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मातोश्री गिरीजाबाई उर्फ जीजी विठोबा भरणे यांचं नुकतचं शुक्रवारी दि. १ जुलै रोजी वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले आहे.मागील काही दिवसांपासून त्यांच्या अकलूज येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली आहे.


आज दुपारी २ वाजता भरणेवाडी येथे त्यांच्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


कै.गिरीजाबाई विठोबा भरणे या जिजी म्हणून सर्वदूर परिचित होत्या. अत्यंत मनमिळावू आणि शांत व प्रेमळ असा स्वभाव असल्याने घरात त्यांचा आदरयुक्त दबदबा होता. माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वडिलांचे मागील वर्षभरापूर्वीच निधन झालं आहे. त्यानंतर आई देखील सातत्याने आजारी असल्याने दत्तात्रय भरणे हे चिंतेत असायचे.त्यांच्या चेहऱ्यावरुन ते स्पष्ट जानवून येतं होतं. हळव्या स्वभावाचे भरणे हे आपल्या बद्दल बोलताना गहिवरून यायचे. आज आईने जगाचा निरोप घेतल्याने दत्तात्रय भरणे यांसह भरणे कुटंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वांना अश्रू अनावर झाले आहेत.


कै. गिरीजाबाई विठोबा भरणे यांच्या पाश्चात्त्य रामचंद्र भरणे, आबासाहेब भरणे, मधुकर भरणे आणी दत्तात्रय भरणे हे चार मुले, चार सुना, तीन मुली, चार पुतण्या (विवाहित ) नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*