कौठळी शाळेत बालचमूनी अनुभवला पालखी सोहळा.
कौठळी शाळेत बालचमूनी अनुभवला पालखी सोहळा.
इंदापूर प्रतिनिधी:आज दिनांक ३० जून २०२२ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठळी येथे वैष्णवांचा मेळा भरला..प्रथम पालखीचे पूजन विद्यार्थी व ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले.नंतर गावामध्ये प्रदक्षिणा घालण्यात आली.त्यामध्ये विठ्ठल-रखुमाई ची वेशभूषा केलेले विद्यार्थी,विणेकरी,टाळकरी,वारकरी,
पताका घेतलेले विद्यार्थी, तुळस डोक्यावर घेतलेल्या मुली,विद्यार्थी, शिक्षक,पालक,माता पालक,गग्रामस्थांनी सहभागी होऊन दिंडी ची शोभा वाढवली. पालखी खांद्यावर घेऊन प्रदक्षिणा घालताना ज्ञानोबा माऊली तुकाराम च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.दिंडीमध्ये सहभागी विद्यार्थी,महिला,पालकांनी फुगड्या,गोल रिंगण,अभंग गायन चा आनंद लुटला.पालकांनी मुलांना खाऊ वाटप केला. आपल्या गावातून तुकाराम-ज्ञानेश्वरांची पालखी जात नाही परंतु शालेय विद्यार्थ्यांनी गावातच घडवले पालखीचे दर्शन असे अनेक पालकांनी बोलून दाखवले.पालखीचे नियोजन शाळेतील शिक्षक,अंगणवाडी सेविका,मदतनीस,पालक,ग्रामस्थ यांनी केले.गावातील भजनी मंडळीनी साथ दिली.या उपक्रमाचे कौतुक गटशिक्षणाधिकारी अजिंक्य खरात साहेब,विस्तार अधिकारी सुनील मुगळे साहेब,केंद्रप्रमुख संभाजी आजबे साहेब,शाळा व्य समितीचे अध्यक्ष, सर्व सदस्य,पालक,ग्रामस्थांनी केले.आभार मुख्याध्यापक नंदकुमार सूर्यवंशी यांनी मानले.
Comments
Post a Comment