महाराष्ट्राच्या राज्यपाल यांच्या हस्ते जय भवानीगड विकास प्रतिष्ठानच्या कार्याचा सन्मान...
महाराष्ट्राच्या राज्यपाल यांच्या हस्ते जय भवानीगड विकास प्रतिष्ठानच्या कार्याचा सन्मान...
इंदापूर वृत्तदर्शन प्रतिनिधी:जगात कोरोनाचे संकट सुरू असताना देखील इंदापूर तालुक्यातील जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडी या संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत कोरोना महामारीवर प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून समाजाप्रती जे कार्य हाती घेतले त्या कार्याची दखल घेत दि.८अक्टो २०२१ रोजी राजभवन येथे महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते संस्थेचा महाराट्राचा कोविड योद्धा पुरस्कार, सन्मानचिन्ह व पन्नास हजार रुपये हा सन्मान जय भवानीगड प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्रीमंत ढोले यांना प्रदान करण्यात आला.
पश्चिम महाराष्ट्रातील इंदापूर तालुक्यातील जय भवानीगड विकास प्रतिष्ठान ही शैक्षणिक संस्था विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून नावारूपाला येत आहे.
कोविड १९ या जागतिक महामारीच्या परिस्थितीत संस्थेने इंदापूर तालुक्यातील ५२ ग्रामपंचायती मध्ये निर्जंतुकीकरणासाठी लागणारे सोडियम हायपोक्लोराईड तसेच ५०००० मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले. समाजाप्रती निष्ठा असणार्याो, स्वत:च्या जीवाची काळजी न करता समाजासाठी दिवस रात्र काम करणारे खरे कोविड योद्धे असणारे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि आशा सेविका व स्थानिक प्रशासन यांच्या सुरक्षिततेची काळजी म्हणून पी.पी.ई किट चे वाटप करण्यात आले.
समाजातील जनजीवन सुरळीत ठेवण्यासाठी आणि समाजातील लोकांना जागृत करण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र कार्य करणारे पोलिस कर्मचार्यांवना सुद्धा संस्थेकडून मास्क, फेसशील्ड आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
कोविड काळात सॅनिटायझरची कमतरता भासत असताना विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी च्या माध्यमातून सॅनिटायझरची निर्मिती करण्यात आली व पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना लगतचे ग्रामपंचायतीस त्याचे मोफत वाटप करण्यात आले.
कोविड परिस्थितीत नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी संस्थेकडून मोफत आर्सेनिक अल्बम या आयुर्वेदिक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
कोविड परिस्थितीत लोकांनी आपला रोजगार गमावल्याने, तसेच बाजारपेठा ठप्प असल्यामुळे ग्रामीण भागात शेतीमालाला व दूधाला दर नसल्याकारणाने सर्वसामान्य लोकांचे अर्थकारण ठप्प होते. अशा परिस्थितीत संस्थेच्या माध्यमातून दीपावली या सणाचे औचित्य साधून ‘आनंदभेट’ या स्वरुपात पंचक्रोशीतील पाच हजार कुटुंबांना अन्नधान्य व इतर गरजेच्या वस्तूचे मोफत वाटप करण्यात आले.
या सर्व कार्याची दखल घेत ‘महाराष्ट्राचा कोविड योद्धा’ या सन्मानाने महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल यांच्या हस्ते जय भवानीगड विकास प्रतिष्ठानचा सन्मान करण्यात आला. असा सन्मान होणारी ग्रामीण भागात कार्य करणारी संस्था असल्याने सर्वत्र कौतुक केले जात आहे. या कार्यक्रमाचे आयोजन DBS ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले होते.
याप्रसंगी सिनेअभिनेत्री दिपाली भोसले सय्यद, संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.श्रीमंतजी ढोले, मुख्य सल्लागार श्री प्रदीपजी गुरव,संस्थेच्या उपाध्यक्षा मा.सौ.चित्रलेखा ढोले, संस्थेचे सचिव मा.श्री.हर्षवर्धन खाडे, प्राचार्य खेडकर सर, जनसंपर्क अधिकारी पवार सर उपस्थित होते.
संस्थेला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल संस्थेचे सर्व विश्वस्त, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
Comments
Post a Comment